
भुसावळ तालुक्यातील मिरगव्हाण शिवारातील गट नं. 95/अ/2/3 मध्ये जिल्हाधिकार्यांच्या आदेशाच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे सदरील जमीन शासन जमा करून संबंधितांवर कारवाईची मागणी नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, सानप यांनी विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे रजिष्टर पोस्टाद्वारे दि. 25-3-2025 रोजी भुसावळ तालुक्यातील मिरगव्हाण शिवार येथील गट नं.95/अ/2/3 या गटामध्ये जिल्हाधिकारी यांनी पत्र क्र. जमीन/3/28 एसआर/19/2017 दि.23/3/2017 रोजी जागा वाटप केलेल्या आदेशाच्या अटीशर्तीचा भंग केला असल्यामुळे सदरील जागा शासन जमा करण्यात यावी अशी तक्रार विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेली आहे. सदरील जागेवर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी आणि संबंधित ठेकेदार यांनी शासनाच्या पैशाचा अपहार करून सदरील गटावर बांधकाम परवानगी नसतांना संत रोहिदास भवन बांधण्यासाठी कोट्यावधी रूपयांची निविदा काढून शासनाची फसवणूक केलेली आहे. तरी सदरील जागा शासन जमा करून संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. असे न झाल्यास संबंधितांविरूध्द उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दिला आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7