
प्रयागराज येथे दि. १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या कुंभमेळा २०२५ दरम्यान प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीची सोय करण्यासाठी रेल्वे बलसाड ते दानापुर आणि वापी ते गया दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे. या विशेष गाड्यांचे तपशील पुढीलप्रमाणे :-
१) बलसाड ते दानापुर कुंभमेळा विशेष (१४ सेवा)
गाडी क्रमांक ०९०१९ (बलसाड – दानापुर) –
बलसाड येथून दि. १७.०१.२५, २१.०१.२५, २५.०१.२५, ०८.०२.२५, १५.०२.२५, १९.०२.२५ आणि २६.०२.२५ रोजी ०८.४० वाजता सुटेल व दानापुर येथे दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०२० (दानापुर – बलसाड) :-
दानापुर येथून दि. १८.०१.२५, २२.०१.२५, २६.०१.२५, ०९.०२.२५, १६.०२.२५, २०.०२.२५ आणि २७.०२.२५ रोजी २३.३० वाजता सुटेल व बलसाड येथे तिसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल.
थांबे – नवसारी, भेस्तान, नंदुरबार, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.
संरचना –
एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी व २ गार्ड्स ब्रेक व्हॅन.
२) वापी ते गया कुंभमेळा विशेष (१८ सेवा)
गाडी क्रमांक ०९०२१ (वापी – गया):
वापी येथून दि. १६.०१.२५, १८.०१.२५, २०.०१.२५, २२.०१.२५, २४.०१.२५, ०७.०२.२५, १४.०२.२५, १८.०२.२५ आणि २२.०२.२५ रोजी ०८.२० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १९.०० वाजता गया येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०२२ (गया – वापी):
गया येथून दि. १७.०१.२५, १९.०१.२५, २१.०१.२५, २३.०१.२५, २५.०१.२५, ०८.०२.२५, १५.०२.२५, १९.०२.२५ आणि २३.०२.२५ रोजी २२.०० वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी १०.०० वाजता वापी येथे पोहोचेल.
थांबे – बलसाड, नवसारी,भेस्तान, नंदुरबार, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, चुनार, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बाबुवा रोड, सासाराम, डेहरी ओन सोंन आणि अनुग्रह नारायण रोड.
संरचना –
एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी व २ गार्ड्स ब्रेक व्हॅन.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, प्रयागराज
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.