भुसावळ शहरातील हॉटेल तनारीका समोर साक्री फाट्याजवळ भुसावळ येथे रास्तीपुरा, सिंधी कॉलनी मागे बऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथून मारुती सुझुकी कंपनीच्या पांढऱ्या रंगाची व्हॅगनार चार चाकी कार सह केसरयुक्त विमल पान मसाला ४,३६,७२० रुपये किंमतीचा पोलिसांना मिळून आला असून १ संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, दि. ९ जानेवारी रोजी ११.१५ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील हॉटेल तनारीका समोर साक्री फाट्याजवळ, भुसावळ हायवे भुसावळ येथे केसरयुक्त विमल पान मसाला महाराष्ट्र राज्यात विक्री व बाळगण्यात प्रतिबंधित असलेले मानवी जीवनास अपायकारक असलेला तंबाखू जन्य सुगंधीत पान मसाला संशयित आरोपी राहुल कुमार मनोहरलाल साधवानी (वय ३२) रा. रास्तीपुरा, सिंधी कॉलनी मागे बऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथून भुसावळच्या दिशेने मारुती सुझुकी कंपनीच्या पांढऱ्या रंगाची व्हॅगनार चार चाकी कार क्रमांक एम.एच.१९ सी.एफ. १६२० मध्ये घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळल्यावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोहेकॉ. गोपाळ पोपट गव्हाळे व पोकॉ सचिन रमेश पोळ यांनी घटनास्थळी सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित वाहनाला थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये तंबाखू जन्य केसर युक्त सुगंधीत पान मसाला सह चारचाकी वाहन मिळून आल्याने पोलिसांनी संशयित आरोपीकडून एकूण ४,३६,७२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
बाजारपेठ पोलीस स्टेशन पोकॉ सचिन पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोपाळ गव्हाळे करीत आहे.
रिपोर्टर – आकाश ढाके, भुसावळ