भुसावळ शहरातील तुकाराम नगरातील साई पार्क रो हाऊस येथील रहिवासी धनश्री प्रमोद भारंबे (वय ३७) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी चोरी करून घरातील रोख रक्कमेसह ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली.
शहरातील तुकाराम नगरातील रहिवासी धनश्री भारंबे या बाहेरगावी गेल्याने घर बंद होते, याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील सोन्याचे दागिने व 13 हजार 500 रूपये रोख असा एकुण 50 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी भारंबे या घरी आल्यावर चोरीची घटना समोर आली. याप्रकरणी त्यांनी येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक राहूल गायकवाड यांनी भेट दिली. हवालदार विजय नेरकर पुढील तपास करीत आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ