Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ शहरात शांततेत गणरायाला निरोप

भुसावळ शहरात शांततेत गणरायाला निरोप

भुसावळ शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीचे शांततेत तसेच भक्तिमय वातावरणात तापी नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले. कुठे हि अनुचित प्रकार घडु नये यासाठी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


भुसावळ शहरातील जागर प्रतिष्ठान पर्यावरण मंचातर्फे घरगुती गणपती घेऊन त्या बदल्यात वृक्षाचे रोप वाटप करण्यात आले. भुसावळ शहर व परीसरात एक चांगला संदेश दिला जात आहे. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला असल्याचे डीवायएसपी वाघचौरे यांनी सांगितले आहे.

गणराया चरणी प्रार्थना

भुसावळ शहर हे गुन्हेगारी मुक्त शहर व्हावे. काही तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. तरुण वर्ग नशामुक्त होऊन त्यांनी उच्च शिक्षण घेऊन शहराचा, राज्याचा व देशाच्या विकासासाठी हातभार लावावा असे गणपतीला साकडे घातले असल्याचे हि डिवाएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading