Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांच्या मानधन, भत्त्यावर निवडणूक आयोगाचा दरोडा! पोलिसांमध्ये प्रचंड असंतोष

निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांच्या मानधन, भत्त्यावर निवडणूक आयोगाचा दरोडा! पोलिसांमध्ये प्रचंड असंतोष


मुख्य निवडणूक आयुक्तांनी लक्ष घालून न्याय देण्याची पोलिसांची मागणी

पंढरपूर (प्रतिनिधी):- 2500/- व 1500/- मानधनाची तरतूद असताना माढ्यात 500/- व सोलापूर मतदारसंघात 800/- मानधन मिळाल्याने पोलिसांमध्ये प्रचंड असंतोषाची लाट उसळली आहे.तसेच या बाबीची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.

मतदारांनी भयमुक्त, तणावमुक्त आणि शांततापुर्ण वातावरणात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो.यासाठी पोलिसांना मानधनाचा दर शासन निर्णय (GR) क्रमांक सीईएल -2017/प्र.क्र.262/17/33 दिनांक 16 नोव्हेंबर,2017 अन्वये राजपत्रित अधिकार्यांना दररोज 2500/- ,तर पोलिसांना 1500/- दररोज रोख स्वरूपात मानधन देण्याचा व सदर खर्च “मागणी क्र.ऐ-2, 2015 निवडणुका ” या मुख्य लेखाशीर्षाखाली प्रकरणपरत्वे अर् संकल्पीय तरतुदीमधून भागविण्याचा शासन आदेश आहे.

       असे असताना सुद्धा पोलिसांना 1500/- रूपयांच्या ऐवजी 500/- रोख मानधन मिळाल्याने, पोलिसांच्या उर्वरित 1000/- रुपयांवर निवडणूक आयोगातील अधिकार्यांनी दरोडा टाकल्याची खमंग चर्चा पोलिस व ठिकठिकाणी होताना दिसत आहे.

      एका लोकसभा मतदारसंघात किमान 2 ते 3 हजार पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो. प्रत्येकी 1000/- जरी दरोडा निवडणूक अधिकार्याने टाकल्याचे ग्राह्य धरले तर प्रत्येक मतदारसंघात हि दरोडा वा अपहाराची रक्कम वीस ते तीस लाख रुपये होते. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडून उघड व दबक्या आवाजात होऊ लागली आहे.

पोलिसांना तैनात बंदोबस्ताच्या ठिकाणी वाळलेल्या भाकरी, दही चरणीचे वाटप

      पोलिसांच्या पगारातून गतमहिन्यात 300/- वजावट करून पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या पोलिस कल्याण निधी मार्फत वाळलेल्या भाकरी, 500 मिली दही असे नमूद केलेले 50 मिली दही, चटणी असा निकृष्ठ आहार पोलिसांना दिल्याने ठिकठिकाणी पोलिसांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निकृष्ठ भोजन, शासन निर्णयानुसार 1500/- मानधनाची तरतूद असताना 500/- रू प्रमाणे वाटप यामुळे पोलीसांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

     पारदर्शक निवडणूकीचा देखावा निर्माण करत असलेल्या निवडणूक आयोगाला हि खुप मोठी चपराक असल्याची माहिती मिळाली आहे.

यह भी देखें :

Report : Jagdish Ji Teli, Khabar 24 Express

Please follow and like us:
error189076

Check Also

खतरे के निशान से ऊपर बह रहा है माही नदी का पानी, सैंकड़ों गांवों का संपर्क कटा, प्रशासन ने लोगों से सुरक्षित स्थान पर जाने को कहा

राजस्थान, मध्यप्रदेश में बारिश लोगों पर कहर ढा रही है। भोपाल में आफत की बारिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy khabar 24 Express? Please spread the word :)