Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भुसावळात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा जल्लोष

रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भुसावळात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा जल्लोष

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


Bhusawal : जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित 34 व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा 2026 चे आयोजन उत्साहात करण्यात आले.

जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेला खेळाडू व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत युवा खेळाडूंशी संवाद साधला. त्यांनी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करत मेहनत, शिस्त आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले.


यावेळी सौ. रजनी सावकारे, भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा सौ. शैलजा नारखेडे, सौ. संगीता बियाणी, भाजपा शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, देवा वाणी, पिंटू कोठारी, अनिता आंबेकर, प्राची पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading