Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express
भुसावळ येथील रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये रेल कामगार सेनेतर्फे जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि महापुरुष जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली तसेच सरचिटणीस दिवाकर देव व कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमात रेल्वेच्या विविध विभागांत कर्तव्यदक्ष आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या २५ गुणवंत कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला.
या वेळी इलेक्ट्रिक लोको शेडचे वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता चाणक्य जैन, उपमुख्य विद्युत अभियंता पवन कुमार, मंडळ विद्युत अभियंता सिरीन संचय, सहायक विद्युत अभियंता प्रताप तंतूवे तसेच रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित कुमार मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती. चाणक्य जैन व ललित मुथा यांनी मार्गदर्शन करत कामगारांच्या योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललित मुथा, राजेश लखोटे, प्रीतम टाक, विनोद वाघे, योगेश माळी, संजय चौधरी, विजय पाटील, दीपक पाटील, सुजित भोळे, कृष्णा महाजन, रुपेश तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनसफ अली यांनी केले, तर आभार प्रदर्शन ललित कुमार मुथा यांनी मानले. या सोहळ्यास रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Related Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Subscribe to get the latest posts sent to your email.