Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात तिकीट तपासणीद्वारे महसूल वाढवण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली जात आहे. वित्त वर्ष 2025–26 मध्ये विभागातील चार तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ₹१ कोटींपेक्षा अधिक महसूल मिळवत ‘करोडपती’ होण्याचा मान मिळवला आहे.
या ‘करोडपती’ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांमध्ये श्री निसार खान (टीटीआय, भुसावळ) यांनी ₹1.47 कोटी, श्री एस. के. गुप्ता (सीटीआय, भुसावळ) यांनी ₹1.16 कोटी, श्री के. के. पटेल (टीटीआय, भुसावळ) यांनी ₹1.02 कोटी, तर श्री डी. एन. चौधरी (सीटीआय, भुसावळ) यांनी ₹1.00 कोटी इतका महसूल तिकीट तपासणीद्वारे जमा केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे रेल्वेच्या महसुलाचे होणारे नुकसान टाळण्यात मोठी मदत झाली असून तिकीट तपासणी विभागाची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, अधिकृत विक्रेते, रेल्वे स्थानकावरील बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम किंवा www.irctc.co.in या संकेतस्थळाद्वारेच वैध तिकीट घेऊन प्रवास करावा. तसेच ‘Rail One’ ॲपद्वारेही तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
विनातिकिट प्रवासाबाबत ‘शून्य सहिष्णुता’ धोरण कायम ठेवत प्रवाशांना सुरक्षित, सन्मानजनक आणि आरामदायी प्रवास अनुभव देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7