Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / कोका-कोला प्रकल्प भुसावळला वर्ग करा; सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळेंची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी

कोका-कोला प्रकल्प भुसावळला वर्ग करा; सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळेंची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी

Jalgaon News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने यश मिळवले असले, तरी जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांच्या वाटपावरून आता नाराजी व्यक्त होत आहे.

जामनेर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेला बहुचर्चित कोका-कोला प्रकल्प भुसावळ एमआयडीसीत वर्ग करावा, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

औद्योगिकदृष्ट्या सक्षम असूनही भुसावळवर वारंवार अन्याय का केला जातो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या दावोस (स्वित्झर्लंड) येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोका-कोला कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मायकल गोल्ट्झमन यांची भेट घेतली होती.

या चर्चेनंतर जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे कोका-कोलाचा मोठा प्रकल्प उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत करत, हा जामनेरसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले होते.


या पार्श्वभूमीवर शिशिर जावळे यांनी भुसावळच्या विकासाकडे होत असलेल्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भुसावळ तालुक्यात रेल्वे जंक्शन, मुबलक पाणी, विकसित एमआयडीसी आणि कुशल मनुष्यबळ अशा सर्व सुविधा उपलब्ध असतानाही मोठे औद्योगिक प्रकल्प येथे का येत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


एका बाजूला चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा SAF प्रकल्प, तर दुसऱ्या बाजूला जामनेरमध्ये कोका-कोला व टेक्स्टाईल पार्क प्रस्तावित असताना भुसावळला सातत्याने डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्योगांच्या अभावामुळे स्थानिक तरुणांमध्ये बेरोजगारी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.


मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात जावळे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “भुसावळच्या औद्योगिक विकासावर अन्याय करू नये. कोका-कोला सारखा मोठा प्रकल्प तातडीने भुसावळ एमआयडीसीत वर्ग करण्यात यावा.”


या मागणीसाठी लवकरच प्रधानमंत्री कार्यालयालाही (PMO) पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


“भुसावळ तालुका औद्योगिक नकाशावर मागे पडत चालला आहे. तरुणांच्या भविष्याचा विचार करून तातडीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प येथे आणावेत, अन्यथा हा अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा शिशिर जावळे यांनी दिला आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading