Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.

शपथविधीचा कार्यक्रम उद्या मुंबईत पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


महाविकास आघाडीतील सत्तासमीकरणात झालेल्या बदलानंतर उपमुख्यमंत्री पद रिक्त होते. त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शपथविधीला राज्यातील प्रमुख नेते, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.


दरम्यान, या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव होणार असून, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या पहिल्या महिला ठरण्याचीही चर्चा आहे.

अधिकृत घोषणा आणि शपथविधीच्या वेळेबाबत अद्याप शासनाकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, मुंबई


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

कालबाह्य शासकीय वाहनांचा तात्काळ लिलाव करा; केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कालबाह्य शासकीय वाहनांचा तात्काळ लिलाव करा; केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading