Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / प्रभाग २० मध्ये वीज समस्यांवर तातडीची कार्यवाही; अपक्ष नगरसेवक राज विजय चौधरी यांचा पुढाकार

प्रभाग २० मध्ये वीज समस्यांवर तातडीची कार्यवाही; अपक्ष नगरसेवक राज विजय चौधरी यांचा पुढाकार

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ नगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक राज विजय चौधरी यांनी निवडून आल्यानंतरच्या पहिल्याच दिवसापासून जनहिताच्या कामांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक २० मध्ये अनेक ठिकाणी वीज वाहिन्या लोंबकळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नगरसेवक चौधरी यांनी तातडीने वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत हा प्रश्न निकाली काढला.


याचबरोबर प्रभागातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी लवकरच दोन नवीन डीपी (डिस्ट्रीब्युशन पॉईंट) बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नगरसेवक चौधरी यांनी संपूर्ण प्रभागात प्रत्यक्ष पाहणी करत ज्या ठिकाणी दिवाबत्तीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी वायरमनला तात्काळ सूचना दिल्या व स्वतः उपस्थित राहून दुरुस्ती करून घेतली.


तसेच प्रभागातील जुने केबल, लोंबकळलेल्या तारा आणि मेंटेनन्सअभावी जीर्ण झालेल्या वीज पोलची दुरुस्ती करून नवीन केबल बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात दोन नवीन डीपी बसवण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेकडे सादर करण्यात आला असून, हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होणार आहे.


निवडीनंतर अवघ्या काही दिवसांतच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून नगरसेवक राज विजय चौधरी यांनी जनतेचा विश्वास संपादन केला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading