Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अन्नातून भीषण विषबाधा; ६० ते ८० प्रशिक्षणार्थी आजारी

भुसावळ रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अन्नातून भीषण विषबाधा; ६० ते ८० प्रशिक्षणार्थी आजारी

भुसावळ येथील झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये अन्नातून तीव्र विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (३० डिसेंबर) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

प्रशिक्षणासाठी आलेल्या सुमारे ६० ते ८० प्रशिक्षणार्थींना अचानक उलट्या, मळमळ आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

आर.पी.डी. परिसरातील रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, गार्ड तसेच तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

मध्यरात्री काही प्रशिक्षणार्थींना अचानक त्रास जाणवू लागल्यानंतर काही वेळातच बाधितांची संख्या झपाट्याने वाढत ८० च्या आसपास पोहोचली. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तत्काळ रुग्णवाहिका पाचारण केल्या आणि सर्व बाधितांना भुसावळ रेल्वे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आरोग्य विभागाने युद्धपातळीवर उपचार सुरू केले.

या संदर्भात माहिती देताना सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मुख्यालय उपाध्यक्ष व्ही. के. समाधीया यांनी सांगितले की, सर्व बाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सुदैवाने कोणालाही गंभीर धोका नाही.

प्राथमिक तपासात ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मेसमधील अन्नामुळेच विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्री एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी आजारी पडल्याने सेंट्रल रेल्वे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe