Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / सुनील काळे यांचा नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न, वरणगावच्या विकासाचा दिला ठाम शब्द

सुनील काळे यांचा नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न, वरणगावच्या विकासाचा दिला ठाम शब्द

वरणगाव | जळगाव जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र परसे | खबर 24 एक्सप्रेस

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव नगरपरिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील काळे यांचा पदग्रहण सोहळा आज दुपारी ४.४० वाजता पारंपरिक व उत्साही वातावरणात पार पडला.

आई-वडिलांसमवेत पदभार स्वीकारत त्यांनी ग्रामदैवत रेणुकादेवी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून तिरंगा चौकातून नगरपरिषदेकडे निशाणी असलेल्या ट्रॅक्टरवरून त्यांचे आगमन झाले.

पदभार स्वीकारल्यानंतर वरणगाव नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनील काळे यांचा सत्कार केला. तसेच जी.एम. फाउंडेशन जामनेरच्या वतीने पितांबर भाऊ यांनीही त्यांचा गौरव केला.

यावेळी जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. राजेंद्र चौधरी उपस्थित होते. त्यांनी “भाजपाचा नगराध्यक्ष निवडून येणे हा ऐतिहासिक विजय असून या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित न राहणे म्हणजे मोठे दुर्दैव ठरेल,” असे मनोगत व्यक्त केले.

सुनील काळे यांनी आपल्या भाषणात आपली राजकीय कारकीर्द भाजपापासून सुरू झाली असून शेवटपर्यंत भाजपातच राहणार असल्याची ग्वाही दिली.

नगराध्यक्ष म्हणून बोलताना सुनील काळे यांनी कार्यकर्त्यांचे आणि वरणगावकरांचे आभार मानले. “जनतेने नोटा दिल्या, मतदान दिले; फुकटात निवडणूक जिंकली नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी वरणगावला ‘आदर्श वरणगाव’ बनवण्याचा संकल्प जाहीर केला.

शहराला २४ तास पाणीपुरवठा, फुलगाव ते साईबाबा मंदिरापर्यंत कोणाचेही नुकसान न करता मोठा डिव्हायडर असलेला रस्ता, सिद्धेश्वर नगर पुनर्वसन, व्यापारी संकुल उभारणी, MIDC संकल्पना, भोगावती नदीचे सुशोभीकरण, जुन्या नगरपालिकेचे नूतनीकरण, महात्मा फुले स्मारक, भूमिगत गटारी अशा महत्त्वाकांक्षी विकासकामांची रूपरेषा त्यांनी मांडली.

यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन वरणगावसाठी भरभरून निधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “विकासासाठी मी कुणासमोरही हात जोडेन, पण विकास थांबू देणार नाही,” असे ठाम मत त्यांनी मांडले. यावेळी ‘ट्रॅक्टर पाण्यावर पळाले’ अशी मिश्किल टीका त्यांनी विरोधकांवर केली.

या पदग्रहण सोहळ्यासाठी वरणगाव परिसरासह बाहेरील तालुक्यांमधूनही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

राजेंद्र परसे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी, खबर 24 एक्सप्रेस


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

NCERT च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; पाठ्यपुस्तक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

NCERT च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; पाठ्यपुस्तक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading