Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा; रक्षाताई खडसे यांची प्रतापराव जाधव यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागणी

रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा; रक्षाताई खडसे यांची प्रतापराव जाधव यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागणी

नवी दिल्ली प्रतिनिधी / आकाश ढाके / Khabar 24 Express


रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री मा. ना. श्री. प्रतापराव जाधव यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.


या भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी रावेर लोकसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याबाबत सविस्तर मागणीपत्र सादर केले.


रावेर मतदारसंघातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व कर्मचारी निवासस्थानांच्या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असून रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव भासत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे जुन्या इमारती पाडून नवीन, सुसज्ज व आधुनिक इमारतींचे बांधकाम करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या मागणीपत्रात मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, यावल, चोपडा व बोदवड तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे व कर्मचारी निवासस्थानांचे नव्याने बांधकाम, काही ठिकाणी केवळ कर्मचारी निवासस्थाने उभारणे, तसेच पाल, रावेर व बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयांचे पुनर्बांधकाम आणि सावदा येथे शवविच्छेदन कक्ष उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध गावांमध्ये नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे उभारण्याचाही समावेश आहे.


यावेळी मा. ना. श्री. प्रतापराव जाधव यांनी सदर मागणी गांभीर्याने विचारात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. रावेर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, नवी दिल्ली


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe