Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / रा.से.यो. +2 स्तराच्या विशेष हिवाळी शिबिरात व्यावसायिक मार्गदर्शन व मोफत आरोग्य तपासणी शिबिर

रा.से.यो. +2 स्तराच्या विशेष हिवाळी शिबिरात व्यावसायिक मार्गदर्शन व मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान व पू. ओं. नाहाटा महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) +2 स्तराच्या विशेष निवासी हिवाळी शिबिरांतर्गत ज्ञानज्योती विद्यालय, खडका येथे दिनांक १७ डिसेंबर रोजी “व्यावसायिक मार्गदर्शन व मोफत रक्त, त्वचा व केस तपासणी शिबिर” यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिरात व्यावसायिक मार्गदर्शनासाठी डॉ. वंदना वाघचौरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी रा.से.यो. स्वयंसेवक व स्वयंसेविकांना मार्गदर्शन करताना आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने व योग्य दिशेने प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. करिअर निवड, कौशल्यविकास आणि आत्मविश्वास याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

या उपक्रमात स्वयंसेवकांची मोफत रक्त, त्वचा व केस तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरासाठी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. रजनी बडगुजर, प्रा. मनीषा बाविस्कर, डॉ. विशाल कांकरिया, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड खान परवेज तसेच पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध आरोग्यविषयक शंकांचे समाधान करून योग्य सल्ला देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. +2 स्तराचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. एन. पी. निळे यांनी केले. सूत्रसंचालन स्वयंसेविका श्रद्धा परदेशी हिने केले, तर आभार प्रदर्शन लावण्या कवठे हिने मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. श्री. टी. एस. सावंत, प्रा. सौ. एस. के. चौधरी, प्रा. सौ. एस. एम. फेगडे व प्रा. श्री. एन. एस. गवळी यांचे सहकार्य लाभले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe