Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / ८०० ग्रॅमच्या नवजात बालकाला जीवनदान, Dr. P. M. Mahajan Memorial Hospital मध्ये Dr. Sumit Mahajan यांच्या टीमचे मोठे यश

८०० ग्रॅमच्या नवजात बालकाला जीवनदान, Dr. P. M. Mahajan Memorial Hospital मध्ये Dr. Sumit Mahajan यांच्या टीमचे मोठे यश

ब्यूरो रिपोर्ट | आकाश ढाके | भुसावळ प्रतिनिधि

८०० ग्रॅम वजनाच्या बालकाला जीवनदान देण्यात डॉ. पी. एम. महाजन मेमोरियल हॉस्पिटल मध्ये डॉ. सुमित महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश

भुसावळ : केवळ ८०० ग्रॅम वजनाने जन्मलेल्या नवजात शिशूचे प्राण वाचवण्यात डॉ. सुमित महाजन आणि त्यांच्या वैद्यकीय टीमने उल्लेखनीय यश मिळवले आहे. अत्यंत कमी वजन, अपूर्ण वाढ व श्वसनासह अनेक गंभीर अडचणींशी झुंज देत असलेल्या या बालकाची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. अशा अवस्थेत विशेष निगा, वेंटीलेटर , वॉर्मर आणि सतत वैद्यकीय निरीक्षणाच्या साहाय्याने उपचार करण्यात आले.

डॉ. सुमित महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली NICU मध्ये सततच्या उपचारामुळे बालकाची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत गेली. अखेर काही आठवड्यांच्या उपचारानंतर बाळाची श्वसनक्षमता, वजन आणि सर्वसाधारण आरोग्य स्थिती स्थिर झाली.

वैद्यकीय इतिहासात १ किलोपेक्षा कमी वजनाच्या बालकांचे उपचार अत्यंत आव्हानात्मक मानले जातात. अशा स्थितीत डॉ. पी. एम. महाजन मेमोरियल हॉस्पिटल च्या वतिने डॉ. सुमित महाजन , डॉ. मिनाक्षी महाजन, डॉ. किरण पाटील आणि डॉ. भूषण धनके यांच्या तज्ज्ञतेमुळे आणि सहाय्यक डॉ. सविता चौहान, डॉ. रुपाली उंबरकर, डॉ. हसन आणि डॉ. मुझेब कुरेशी तसेच नर्सिंग स्टाफ च्या समर्पणामुळे मिळालेले हे यश उल्लेखनीय ठरत आहे.

पालकांनी डॉक्टर व संपूर्ण रुग्णालयीन कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, “आम्ही आशा हरलो होतो, पण डॉक्टरांनी आमच्या बाळाला नवे जीवन दिले,” अशा शब्दांत भावना मांडल्या.

ब्यूरो रिपोर्ट | आकाश ढाके | भुसावळ प्रतिनिधि


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading