वरणगाव | राजेंद्र परसे | जळगाव जिल्हा विशेष प्रतिनिधी

वरणगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.
काल रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक नगरपरिषद कार्यालयातील लाईट बंद झाल्याची घटना घडली. त्याचबरोबर आज काही काळासाठी स्ट्रॉंग रूम परिसरातील CCTV फुटेज बंद असल्याचेही निदर्शनास आले. या दोन्ही घटना अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र विश्वनाथ चौधरी तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार समाधान महाजन, सौ. योगिता सोनार आणि इतर उमेदवारांनी केला आहे.
उमेदवारांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेली आहेत, त्या ठिकाणी 24 तास कडेकोट सुरक्षा असणे आवश्यक आहे. मात्र, अचानक लाईट बंद होणे आणि काही काळासाठी CCTV यंत्रणा बंद राहणे, ही बाब निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तातडीने सुनियोजित आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने सामान्य मतदारही नगरपरिषद परिसरात उपस्थित राहिले होते. भारताच्या लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवावर, म्हणजेच निवडणुकीच्या प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारचा आघात होऊ नये, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असा सूर सामान्य नागरिकांमधूनही उमटताना दिसत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे निवडणूक प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत असून, स्ट्रॉंग रूमची सुरक्षा अधिक कडक करण्याची मागणी जोर धरत आहे. येत्या मतमोजणीपूर्वी या संशयास्पद प्रकारांचा सखोल तपास व्हावा, अशी अपेक्षा उमेदवार आणि मतदार दोघांनीही व्यक्त केली आहे.
राजेंद्र परसे
Khabar 24 Express
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines Khabar 24 Express Indias Leading News Network, Hindi News – Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines, current affairs, cricket, sports, business and cinema, Latest Hindi News, Breaking News in Hindi, Bollywood Gossip, Bollywood News, Top Hindi News Channel, Khabar 24 Express Live TV, Khabar24, Khabar24 Express