ब्यूरो रिपोर्ट | आकाश ढाके | भुसावळ प्रतिनिधि

भुसावळ : केवळ ८०० ग्रॅम वजनाने जन्मलेल्या नवजात शिशूचे प्राण वाचवण्यात डॉ. सुमित महाजन आणि त्यांच्या वैद्यकीय टीमने उल्लेखनीय यश मिळवले आहे. अत्यंत कमी वजन, अपूर्ण वाढ व श्वसनासह अनेक गंभीर अडचणींशी झुंज देत असलेल्या या बालकाची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. अशा अवस्थेत विशेष निगा, वेंटीलेटर , वॉर्मर आणि सतत वैद्यकीय निरीक्षणाच्या साहाय्याने उपचार करण्यात आले.
डॉ. सुमित महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली NICU मध्ये सततच्या उपचारामुळे बालकाची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत गेली. अखेर काही आठवड्यांच्या उपचारानंतर बाळाची श्वसनक्षमता, वजन आणि सर्वसाधारण आरोग्य स्थिती स्थिर झाली.
वैद्यकीय इतिहासात १ किलोपेक्षा कमी वजनाच्या बालकांचे उपचार अत्यंत आव्हानात्मक मानले जातात. अशा स्थितीत डॉ. पी. एम. महाजन मेमोरियल हॉस्पिटल च्या वतिने डॉ. सुमित महाजन , डॉ. मिनाक्षी महाजन, डॉ. किरण पाटील आणि डॉ. भूषण धनके यांच्या तज्ज्ञतेमुळे आणि सहाय्यक डॉ. सविता चौहान, डॉ. रुपाली उंबरकर, डॉ. हसन आणि डॉ. मुझेब कुरेशी तसेच नर्सिंग स्टाफ च्या समर्पणामुळे मिळालेले हे यश उल्लेखनीय ठरत आहे.
पालकांनी डॉक्टर व संपूर्ण रुग्णालयीन कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, “आम्ही आशा हरलो होतो, पण डॉक्टरांनी आमच्या बाळाला नवे जीवन दिले,” अशा शब्दांत भावना मांडल्या.
ब्यूरो रिपोर्ट | आकाश ढाके | भुसावळ प्रतिनिधि
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines Khabar 24 Express Indias Leading News Network, Hindi News – Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines, current affairs, cricket, sports, business and cinema, Latest Hindi News, Breaking News in Hindi, Bollywood Gossip, Bollywood News, Top Hindi News Channel, Khabar 24 Express Live TV, Khabar24, Khabar24 Express