भुसावळ | प्रतिनिधी | आकाश ढाके

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खमताणे येथे ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी नाभिक समाजाच्या पारंपरिक व्यवसायाबाबत केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्याचा भुसावळ शहर नाभिक संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
या संदर्भात भुसावळ नाभिक संघाच्या शिष्टमंडळाने आज उपविभागीय प्रांताधिकारी, भुसावळ यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खमताणे (ता. सटाणा, जि. नाशिक) येथे नाभिक समाजातील ९ वर्षीय बालिकेवर ७० ते ७५ वर्षीय वृद्धाने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याची घटना अत्यंत संतापजनक व मानवतेला काळीमा फासणारी आहे.
निवेदनातील दुसऱ्या मुद्द्यात आमदार जयंत पाटील यांनी दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नाभिक समाजाला संत शिरोमणी संत सेना महाराजांचा महान वारसा लाभलेला असून, त्यांनी नाभिक व्यवसायाच्या रूपकातून समाजप्रबोधन आणि आत्मशुद्धीचा संदेश दिला आहे.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी शब्द मागे न घेता माफी मागण्यास नकार दिल्याने नाभिक समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. हे वक्तव्य समाजाप्रती तिरस्कार, हिनता व द्वेषभावना दर्शवणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भुसावळ शहर नाभिक संघ तसेच सकल नाभिक समाजाच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात येत असून, आमदार जयंत पाटील यांनी तात्काळ समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भुसावळ | प्रतिनिधी | आकाश ढाके
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7