
आकाश ढाके | भुसावळ प्रतिनिधी | दि. 30 भुसावळ : नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ४ ‘ब’, ५ ‘ब’ आणि ११ ‘ब’ या तीन प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांनी आज अधिकृतपणे जारी केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रभागांबाबत काही प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे स्पष्टता आवश्यक असल्याने आयोगाने तत्काळ कारवाई करत निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या पत्रानुसार आज आदेश बजावणीस आणत या तीनही प्रभागांतील पुढील सर्व निवडणूक कार्यक्रम तात्पुरते थांबवण्याची माहिती दिली आहे.
निवडणूक स्थगितीमुळे या भागातील राजकीय समीकरणांवर देखील परिणाम होण्याची शक्यता असून उमेदवारांना आता नव्या तारखांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आगामी आदेश येईपर्यंत संबंधित प्रभागांमध्ये कोणतीही निवडणूक प्रक्रिया राबवू नये, असेही स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7