
भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांच्या प्रचाराला मोठा वेग आला आहे. बुधवारी त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक १३, १८, ११ आणि १९ सह विविध भागांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला.
बुधवारी सकाळच्या सत्रात प्रभाग १३ आणि १८ मधील प्रचाराची सुरुवात रेणुका माता मंदिर परिसरातून झाली. त्यानंतर गुर्जर कॉलनी, रिंग रोड, शिवदत्त नगर परिसरात संपर्क दौरा काढण्यात आला. घराघरात जाऊन नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन महायुतीचा विकासदृष्टिकोन मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला.
दुपारच्या सत्रात रजनी सावकारे यांनी प्रभाग क्रमांक ११ व १९ मध्ये विठ्ठल मंदिर वार्ड आणि शनि मंदिर वार्ड येथे भेट देत प्रचार केला. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून शहराच्या एकात्मिक विकासासाठी आवश्यक योजना आणि महायुतीचा संकल्प त्यांनी मतदारांसमोर मांडला.
या दौऱ्यात भाजप- महायुतीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, स्थानिक प्रतिष्ठित मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी रजनी सावकारे यांचे स्वागत करत त्यांना पाठिंबा व्यक्त केला.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7