Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / जामनेर नगरपरिषद : साधना महाजन यांची नगराध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड

जामनेर नगरपरिषद : साधना महाजन यांची नगराध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड

जामनेर शहरात आज एक महत्त्वाचा राजकीय निर्णय जाहीर झाला असून, मा. साधना महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदावर बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या निवडीमुळे नगरपरिषद परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी जल्लोषात साधना महाजन यांचे स्वागत केले.

निवड जाहीर झाल्यानंतर नागरिक, स्थानिक मान्यवर, नगरसेवक तसेच पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी साधना महाजन यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत शहराच्या प्रगतीसाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना साधना महाजन म्हणाल्या,
“जामनेर शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणे हेच आमचे ध्येय असेल.”

त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे जामनेरच्या विकासाच्या दिशा ठरवण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जामनेर


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading