Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळातील श्याम भक्त सागर शिंदे यांचे भव्य स्वागत

भुसावळातील श्याम भक्त सागर शिंदे यांचे भव्य स्वागत

Akash Dhake | भुसावळ प्रतिनिधी – दि. ८ नोव्हेंबर रोजी भुसावळातील विठ्ठल मंदिर वार्ड येथे राहणारे श्याम भक्त सागर शिंदे यांनी ११०० किलोमीटर सायकल प्रवास करून राजस्थानमधील खाटू श्याम दरबार येथे दर्शन घेतले. अवघ्या काही दिवसांत हा कठीण प्रवास पूर्ण करून ते आज भुसावळात परत आले.

त्यांच्या आगमनानिमित्त आज अष्टभुजा माता मंदिरापासून सर्व श्याम भक्त, श्याम प्रेमी आणि मित्रपरिवारांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मार्गात विविध ठिकाणी सागर शिंदे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

मिरवणुकीचा समारोप सागर शिंदे यांच्या घरी करण्यात आला. घराजवळ भजन-कीर्तन, पुष्पवर्षा, तसेच सुंदर रांगोळी काढण्यात आली. कार्यक्रमानंतर मित्रपरिवार व उपस्थितांना प्रसादरूपाने जेवण देण्यात आले.

Akash Dhake | भुसावळ प्रतिनिधी


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe