
Akash Dhake | भुसावळ : आगामी नगरपालिका निवडणुकीत भुसावळ नगरपालिकेच्या ५० जागांवर लढण्याची तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरू ठेवावी, असे आवाहन पक्षाचे उपनेते तथा जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.
वाघ पुढे म्हणाले, “सन्मानजनक जागा मिळाल्यास आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र त्याची वाट न पाहता शिवसेना आपल्या निष्ठावान शिवसैनिकांच्या मनगटाच्या जोरावर, पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. नगराध्यक्ष पदावर विजय मिळविण्यात शिवसेना निर्णायक भूमिका निभावेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चांदीच्या तलवारीने नवा जिल्हाप्रमुख सन्मानित –
बैठकीदरम्यान वाघ म्हणाले, “इतिहासातील बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे लढा देण्यासाठी पक्षाने चंद्रकांत शर्मा यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. विजयाची पताका फडकवल्याशिवाय शांत बसू नका,” असे ते म्हणाले.
भुसावळ शहराच्या वतीने चंद्रकांत शर्मा यांचा चांदीची तलवार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात व उपस्थित मान्यवर –
कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संविधान रचयिता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पणाने झाली.
या बैठकीस महिला जिल्हाप्रमुख रोहिणी ताई पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, तालुकाप्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख गणेश चौधरी, शहरप्रमुख शेख मकबूल, शैख फरीद, प्रा. उत्तम सुरवाडे, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, बाळासाहेब भोई, उमाकांत झांबरे, सुनील भोई, पल्लवी जैन, उमाकांत शर्मा (नमा), राकेश खरारे, अरुण सालुंखे, शरद जैसवाल, जवाहर गौर, मिलिंद कापडे, राकेश भोई, समाधान भोई, शेख अब्बास आदी मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7