Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे रनिंग स्टाफच्या प्रलंबित मागण्यांसाठी भुसावळात विशाल धरना आंदोलन

सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे रनिंग स्टाफच्या प्रलंबित मागण्यांसाठी भुसावळात विशाल धरना आंदोलन


भुसावळ, दि. 17 ऑक्टोबर | प्रतिनिधी – आकाश ढाके : सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार रेल्वे रनिंग स्टाफच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्य रेल्वेच्या सर्व मंडल मुख्यालयांवर एकाचवेळी विशाल धरना आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार भुसावळ येथे शुक्रवारी दिवसभर DRM कार्यालयाबाहेर सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या रनिंग शाखेतर्फे आंदोलन पार पडले.

या आंदोलनाचे नेतृत्व मंडल अध्यक्ष श्री शेख मोहम्मद इरफान, मंडल सचिव श्री एस. बी. पाटील आणि मंडल समन्वयक श्री ए. के. तिवारी यांनी केले. रनिंग शाखा सचिव श्री ए. के. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो रेल्वे कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

धरना आंदोलनादरम्यान रेल्वे बोर्ड, मुख्यालय व मंडल स्तरांवरील विविध प्रलंबित मागण्या मांडत सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन मंडल रेल्वे प्रबंधक (DRM) यांना सुपूर्त करण्यात आले.

या प्रसंगी मंडल सचिव (वर्कशॉप) श्री किशोर भागवत कोलते, मंडल कोषाध्यक्ष श्री एस. के. दुबे, मंडल संघटक श्री दीपक अढाईंगे, मंडल कार्याध्यक्ष श्री ए. एस. राजपूत, महिला मंडल अध्यक्षा श्रीमती अलका चौधरी यांनी सरकारविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सर्व कामगारांनी एकत्र येऊन संघर्ष अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले.

धरना आंदोलनात रनिंग शाखा कोषाध्यक्ष श्री सचिन जैसवाल यांनी विशेष योगदान दिले. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात श्री आर. के. मेघवाल, श्री संजय चौधरी, श्री आर. के. सिंह, श्री एम. के. चौधरी, श्री अभय मांडवकर, श्री मयूर वाणी, श्री डी. के. सोनी, श्री एच. ए. मुरई, श्री रणधीर कुमार, श्री के. पी. चौधरी, श्री दीपक खराटे, श्री भूपेंद्र रणधीर, श्री तोरण सिंह, श्री आलोक मिश्रा, श्री महेंद्र सपकाले, श्री जयेश ढाकणे, श्री अजय महाजन, श्री उमाकांत बाउसकर, श्री दीपक शर्मा, श्री पंकज गुप्ता, श्री सुरेश हिरन्ना, श्री अजित अमोदकर, श्री हरिचंद सरोदे, श्रीमती कल्पना भालेराव, श्रीमती मंगला मोटे, श्री आनंद गांगुरडे, श्री रोशनलाल यादव आदींसह सर्व शाखा कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe