Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / चंद्रशेखर बावनकुले यांचा मोठा निर्णय : मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात सुधारणा करण्याची मागणी

चंद्रशेखर बावनकुले यांचा मोठा निर्णय : मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात सुधारणा करण्याची मागणी

आकाश ढाके | मुंबई : राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर-अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक महत्त्वपूर्ण पत्र सादर केले आहे. या पत्रात त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन सदस्यांची “स्वीकृत सदस्य” (Approved Members) म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

बावनकुले यांनी सांगितले की, या सुधारणेमुळे समाजाभिमुख आणि ग्रामविकासासाठी कार्यरत कार्यकर्त्यांना स्थानिक प्रशासनिक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल.
त्यांनी नमूद केले की, या बदलामुळे ग्रामीण विकासाची गती वाढेल आणि समाजसेवेतील लोकांना निर्णय प्रक्रियेत आपली भूमिका बजावता येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चंद्रशेखर बावनकुले म्हणाले की, “ही सुधारणा समाजाभिमुख कार्यकर्त्यांसाठी ग्रामविकासाच्या दिशेने नवे दरवाजे उघडेल आणि महाराष्ट्रातील ग्रामीण रचनेला अधिक बळकटी देईल.”


ब्यूरो रिपोर्ट : आकाश ढाके


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading