
Report Akash Dhake | भुसावळ : भुसावळ महसूल विभागात लाचलुचपत प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. डंपरद्वारे वाळूची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दरमहा ७३ हजार रुपयांचा हफ्ता तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना द्यावा लागेल, अशी मागणी खासगी पंटरकडून करण्यात आली होती. या व्यवहारादरम्यान पंटर शिवदास कोळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.
या प्रकरणात वराडसीम येथील तलाठी नितीन पंडितराव केले, कोतवाल जयराज भालेराव आणि पंटर शिवदास कोळी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या कारवाईनंतर तहसीलदार नीता लबडे आणि संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता असल्याची माहिती एसीबीचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांनी दिली. तलाठी नितीन केले यांच्या घराची झडती घेण्यात आली असता कोणतीही संशयास्पद मालमत्ता आढळली नाही, मात्र त्यांच्या ताब्यातून १ लाख ६५ हजार रुपये रोकड आणि दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. तर कोतवाल भालेराव यांच्याकडून एक मोबाईल, आणि पंटर कोळीच्या ताब्यातून ७३ हजार रुपयांची लाचेची रक्कम व अतिरिक्त ८६ हजार रुपये जप्त करण्यात आले.
या प्रकरणामुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ माजली असून, पुढील चौकशीदरम्यान अधिक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7