Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / महिला उद्योजकतेस प्रोत्साहन प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम

महिला उद्योजकतेस प्रोत्साहन प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम

Akash Dhake | भुसावळ : महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या उद्योजकतेच्या क्षमतेला व्यासपीठ देण्यासाठी प्रतिष्ठा महिला मंडळाने पुन्हा एक पाऊल पुढे टाकले आहे.

२०११ पासून या सामाजिक संस्थेमार्फत तालुक्यातील घरगुती महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची प्रेरणा दिली जात आहे.

दरवर्षी विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रदर्शनांमुळे अनेक महिलांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याची सुवर्णसंधी मिळते.

यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात महिलांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक आणि उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे.

फुलवाती, तोरण, दिवे, घरगुती सजावटीचे साहित्य, पारंपरिक कपडे, कॉस्मेटिक उत्पादने आणि दिवाळीसाठी लागणारे सर्व साहित्य अशा विविध वस्तू एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांच्या कलागुणांना समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक पाठबळ मिळत असून त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होत आहे.

प्रतिष्ठा महिला मंडळाने नागरिकांना आवाहन केले आहे की, “या प्रदर्शनाला भेट द्या, महिलांच्या मेहनतीचा सन्मान करा आणि त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्या.”

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading