Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / “राष्ट्र सेविका समिती”च्या कार्याला ८९ वर्षे पूर्ण – भुसावळमध्ये शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव साजरा

“राष्ट्र सेविका समिती”च्या कार्याला ८९ वर्षे पूर्ण – भुसावळमध्ये शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव साजरा

Report | Akash Dhake | भुसावळ : ‘हम करे राष्ट्र आराधन’ या विचारधारेवर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय महिला संघटनेला, “राष्ट्र सेविका समिती”ला यावर्षी कार्याची ८९ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरातील तसेच परदेशातील शाखांमधून विविध उपक्रमांच्या माध्यमातून संघटनेचे कार्य सातत्याने सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत “राष्ट्र सेविका समिती” भुसावळ शाखेतर्फे “शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव” चे आयोजन अहिल्यादेवी कन्या विद्यालय, जामनेर रोड, भुसावळ येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर विभाग बौद्धिक प्रमुख श्रीमती अनिताताई अनिल कुलकर्णी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शहरातील सेविका भगिनींनी आकर्षक पथसंचलन काढत उत्सवाला सुरुवात केली. हिंदू संस्कृतीत शस्त्रपूजनाला विशेष महत्त्व आहे. असुरी वृत्तीवर विजय मिळवून समाजात सद्वृत्तीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे म्हणाल्या की, महिलांच्या संघटन, शौर्य आणि आत्मविश्वासाच्या वृद्धीसाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे.

या सोहळ्याला भुसावळ परिसरातील सर्व सेविका भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading