Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्याचा मुख्य उद्देश शेत पाणंद रस्त्यांचे सीमांकन, मोजणी आणि अतिक्रमण हटवणे हा आहे.

भुसावळ तालुक्यात या मोहिमेअंतर्गत सुमारे 90 पाणंद रस्त्यांचे सीमांकन व मोजणी केली जाणार आहे. त्याची सुरुवात साकेगाव आणि खडके गावातून झाली. साकेगाव येथील अंदाजे 1.5 ते 2 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि खडके गावातील दोन पाणंद रस्त्यांचे (प्रत्येक 1.5 ते 2 किलोमीटर) सीमांकन व मोजणी करण्यात आले. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल आणि तालुका प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

तहसीलदार भुसावळ यांनी महादेव माळ येथे भेट देऊन शिवार फेरी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी महादेव माळला महसूल गावाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रशासनाला मार्गदर्शन केले. तसेच भिल्ल व बंजारा समाजाच्या लाभार्थ्यांना दाखले वितरित केले आणि विविध योजनांसाठी अर्ज भरून घेण्याचे निर्देश दिले.

यासोबतच महसूल प्रशासनाच्या वतीने भुसावळ येथील भिल्ल वस्तीला भेट देऊन निराधार आणि विधवा महिलांशी संपर्क साधला गेला. त्यांना संजय गांधी योजना आणि श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज भरून घेण्यात आले तसेच इतर विविध योजनांची सविस्तर माहिती दिली गेली.

शेतकरी, विद्यार्थी आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे, आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होईल.


ब्यूरो रिपोर्ट : आकाश ढाके



Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading