Breaking News
BigRoz Big Roz
Home / खबरें / धार (मध्यप्रदेश) येथून प्रधानमंत्री मोदींनी “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” ला दिला प्रारंभ

धार (मध्यप्रदेश) येथून प्रधानमंत्री मोदींनी “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” ला दिला प्रारंभ

धार (मध्यप्रदेश), दि. १७ सप्टेंबर २०२५ – सेवा पंधरवडा २०२५ अंतर्गत “सेवा हाच संकल्प – भारत हिच पहिली प्रेरणा” या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आज धार येथून “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” (SNSPA) चा औपचारिक शुभारंभ केला. हे अभियान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असून महिला व बाल विकास मंत्रालय या मोहिमेत सक्रिय भागीदारी निभावत आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश संपूर्ण देशातील महिलां आणि बालकांसाठी आरोग्य सेवा मजबूत करणे, सेवेची पोहोच आणि गुणवत्ता वाढवणे आणि जनजागृतीस प्रोत्साहन देणे हा आहे. सार्वजनिक सहभागावर भर देणारे हे अभियान खासगी रुग्णालये आणि आरोग्यसेवा व्यावसायिक यांच्या सहभागातून आरोग्यसेवेची प्रभावी अंमलबजावणी साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

धार येथून सुरू झालेल्या या अभियानाचा जळगांव येथे देखील भव्य कार्यक्रम घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, रजनी सावकारे, भैरवी वाघ-पलांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, डॉ. इंद्रानी मिश्रा, जिल्हा शल्यचिकित्सा डॉ. किरण पाटील, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत देशभर राबवले जाणार आहे. या कालावधीत आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांमध्ये १ लाख आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ही शिबिरे विशेषतः महिलांच्या आणि बालकांच्या आरोग्याशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी, पोषण, आरोग्य जागरूकता आणि कुटुंब कल्याण यावर भर देण्यासाठी तयार करण्यात आली आहेत.

अंगणवाडी केंद्रांसारख्या व्यासपीठांचा वापर करून माता आणि बाल आरोग्य कार्यक्रम अधिक सुलभ आणि टिकाऊ करण्यावर भर दिला जात आहे. हे अभियान निरोगी आणि सक्षम कुटुंबे निर्माण करण्याच्या सरकारच्या व्यापक ध्येयाशी सुसंगत असून समावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देणारे आहे.


ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके



Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe