Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / भुसावळात खो-खो स्पर्धेत विद्यालयाचे तीन संघ विजयी

भुसावळात खो-खो स्पर्धेत विद्यालयाचे तीन संघ विजयी

भुसावळ, प्रतिनिधी Akash Dhake : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ आणि बियाणी एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बियाणी स्कूल, भुसावळ येथे तालुका स्तरीय मुलींच्या १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील खो-खो स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पी.आय. भारती काळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार प्रीती लुटे असून, प्रमुख अतिथी म्हणून बियाणी एज्युकेशन ट्रस्टचे पियुष बियाणी, शाळेचे प्राचार्य रुद्रसेन गाठीयां, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, मुख्याध्यापिका विलास पाटील, वंदना ठोके यांच्यासह अनेक क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, पंच आणि खेळाडू उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमात मेजर ध्यानचंद व मामा बियाणी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन व क्रीडांगण पूजन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप साखरे यांनी केले. तृप्ती लुटे मॅडम यांनी विविध दाखल्यांबाबत माहिती दिली आणि ते सोप्या पद्धतीने कसे मिळवता येतील याविषयी मार्गदर्शन केले. तसेच, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते,” असे सांगून नारी सशक्तीकरणावर भर दिला.

भारती काळे पाटील यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज, फिर्यादी व तक्रारदारांच्या अपेक्षा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच खेळाडूंना आहार, हायड्रेशन आणि खेळातील शिस्त याबाबत सविस्तर माहिती दिली. “या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे शासनाकडून ५% आरक्षण मिळते, जे पुढे नोकरीसाठी फायदेशीर ठरते,” असे सांगून त्यांनी खेळात सातत्य राखण्याचे आवाहन केले. खेळाडूंनी कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जावे आणि खेळातून आपल्या कौशल्याचा विकास करावा, असेही त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

स्पर्धेतील सहभाग आणि निकाल

या स्पर्धेत २२ मुलांचे संघ – २४४ खेळाडू आणि २७ मुलींचे संघ – ३२४ खेळाडू यांनी सहभाग नोंदविला.

  • १४ वर्ष वयोगट (मुली):
    अंतिम सामना राधो माध्यमिक विद्यालय कुऱ्हा पान विरुद्ध माध्यमिक विद्यालय ओझरखेडा यांच्यात रंगला. यात राधो माध्यमिक विद्यालय कुऱ्हा पान विजयी झाले. ओझरखेडा संघ दुसऱ्या क्रमांकावर, तर दामू पांडू पाटील संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
  • १७ वर्ष वयोगट (मुली):
    अंतिम सामना पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय वराडसीम आणि अरुणोदय माध्यमिक विद्यालय बोहर्डी यांच्यात झाला. यात पंडित नेहरू विद्यालय विजयी झाले. अरुणोदय विद्यालय दुसऱ्या क्रमांकावर, तर श्रीकृष्ण हायस्कूल शिंदीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • १९ वर्ष वयोगट (मुली):
    अंतिम सामना गंगाधर सांडू चौधरी ज्युनियर कॉलेज आणि बियाणी ज्युनिअर कॉलेज यांच्यात रंगला. यात गंगाधर सांडू चौधरी कॉलेज विजयी झाले, बियाणी ज्युनिअर कॉलेज दुसऱ्या क्रमांकावर आणि बी. झेड उर्दू हायस्कूल संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

स्पर्धेची यशस्विता आणि सहयोग

या स्पर्धेत पंच म्हणून डॉ. प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एस. पाटील, मुकेश मोरे, अनिल महाजन, लक्ष्मीकांत नेमाडे, सुनील चौधरी, एन. डी. राजपूत, नविन नेमाडे, दिलीप सुरवाडे, राठोड सर, अझर सर यांनी योगदान दिले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी पी.आर. साखरे, रुद्रसेन गाठीयां, तोसीब कुरेशी यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केले.

या स्पर्धेमुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि सकारात्मक ऊर्जा वाढली. खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करत उत्कृष्ट खेळ दाखवला.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading