Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर नाटीका ; प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर नाटीका ; प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजन

शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर नाटीकेचे आयोजन रविवार, 17 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रोफेसर कॉलनीतील संतोषी माता हॉलमध्ये करण्यात आले आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सहकार्यातून सादर होत असलेल्या नाटीकेतून स्थानिक कलावंत सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे असतील तर अन्य पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

नेताजींच्या शौर्याची नाटीकेतून होणार उकल
भारताच्या स्वातंत्र्यात नेताजींनी महत्त्वाची भूमिका बजावली असून तरुणांमध्ये स्वातंत्र्यासाठी लढण्याची उत्कट इच्छा निर्माण केली.

नेताजींनी स्वातंत्र्यासाठी जय हिंद, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा, चलो दिल्ली अशा घोषणा दिल्या ज्यामुळे तरुणांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 23 जानेवारी रोजी जयंती साजरी केली जाते मात्र 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या योगदानाची दखल घेऊन हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून नेताजींची जयंती दरवर्षी शौर्य दिन म्हणून साजरी केली जाते.

देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग घेतलेल्या नेताजींच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, त्यांचे विचार रूजावेत या हेतूने भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे या नाटीकेचे आयोजन करण्यात आले आहे. ही नाटीका शहरातील सर्व स्थानिक कलावंत सादर करणार असून मोफत नाटीकेचा शहरातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक तथा प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

.

.

.

.

.


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुक्ताईनगरात भाजपाचा मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुक्ताईनगरात भाजपाचा मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading