
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण तर्फे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या विशेष उपस्थितीत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदरील रक्तदान शिबिर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला. शिबिराची सुरुवात भारत मातेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शिबिरास भाजपा राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे, भाजपा शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, प्रशांत पाटील, गोलू पाटील, युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, मनोज बियाणी, अतुल झांबरे, सतीश सपकाळे, भालचंद्र पाटील, गिरीश महाजन, परिक्षीत बऱ्हाटे, खुशाल जोशी, प्रवीण इखणकर, अजय नागराणी, दिनेश राठी, मुकेश पाटील, राजेंद्र आवटे, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, पल्लवी वारके, पवन बुंदेले, अमित असादेकर, संजय भिरुड, प्रशांत निकम, राहुल तायडे, शिवाजी पाटील, समाधान पवार, जयंत माहूरकर, योगेंद्र हरणे, कुणाल येवले, विनीत पाटील, सागर चौधरी, जीवन वारके, संग्राम सिंग पाटील, अरुणा पाटील, रीता नाईक, वंदना सोनार, हर्षा जोशी, वैभव महाजन, अजय तायडे, संघदीप नरवाडे, अल्बर्ट तायडे, महेश पटेल, आनंद ठाकरे, जितेंद्र कोळी, अनिरुद्ध कुलकर्णी, मुकेश मोरे, प्रशांत महाजन, दिनेश राणे, चेतन जैन, आकाश राजपूत, भावेश चौधरी, सागर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या रक्तदान शिबिरास रेड क्रॉस सोसायटी यांचे सहकार्य लाभले.
हा उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साकारण्यात आला असून, रक्तदानाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने घेण्यात येणार असल्याचे भुसावळ भाजपा तर्फे सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांनी केले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
.
.
.
.
.
.
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7