Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / मंत्री रक्षाताई खडसेंच्या हस्ते ‘मन की बात – टॅलेंट हंट सिझन 5’ च्या अंतिम फेरीच्या स्पर्धेचे उद्घाटन

मंत्री रक्षाताई खडसेंच्या हस्ते ‘मन की बात – टॅलेंट हंट सिझन 5’ च्या अंतिम फेरीच्या स्पर्धेचे उद्घाटन

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई यांनी ‘मन की बात’ चा युवकांमध्ये राष्ट्राभिमान व कौशल्य विकास घडवण्यातील महत्त्वाचा सहभाग अधोरेखित केला.

तिरुवनंतपुरम (केरळ) मध्ये मेनामकुलम, कझाक्कूट्टम येथील ज्योथिस सेंट्रल स्कूल मध्ये केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी “मन की बात टॅलेंट हंट सिझन 5” च्या अंतिम फेरीच्या स्पर्धेचे उद्घाटन केले, यावेळी माजी केद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री श्री. व्ही. मुरलीधरन हे प्रमुख उपस्थितीत होते. सशक्त तरुणांचा ‘विकसित भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुलक्षून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. केरळ मधील ‘ग्लोबल गिव्हर्स फाउंडेशन’ आणि ‘मेरा युवा भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांना ‘मन की बात’ कार्यक्रमातील प्रेरणादायी विचारांमधून शिकण्याचा आणि त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मंत्री रक्षाताई खडसे यांनी उद्घाटन भाषणात सांगितले की, ‘मन की बात टॅलेंट हंट’ हे युवकांसाठी एक प्रभावशाली व्यासपीठ आहे जे त्यांना देशाच्या भावना, सामूहिक आकांक्षांशी जोडले जाण्यास आणि चिंतन व संवाद कौशल्य विकसित करण्यास प्रवृत्त करते. ‘मन की बात’ मधील विचारांशी एकरूप होताना हे युवा केवळ भारताबद्दल शिकत नाहीत, तर ‘विकसित भारत’ ची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे जबाबदार आणि माहितीपूर्ण नागरिक म्हणूनही घडत आहेत.”

या स्पर्धांमध्ये हायस्कूल, हायर सेकंडरी आणि उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात रेडिओ जॉकी (आरजे) स्पर्धा, वादविवाद, रील क्रिएशन, आणि ‘मन की बात’ मधून प्रेरणा घेत तयार केलेले प्रकल्प सादरीकरण यांचा समावेश होता. या बहुआयामी स्वरूपाच्या कार्यक्रमातून केंद्रीय युवा मंत्रालयाने युवकांच्या सर्वांगीण विकास, कौशल्य वृद्धी आणि नागरी सहभाग वाढवण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा आकाशवाणी वर प्रसारित होणारा कार्यक्रम जगातील सर्वाधिक ऐकला जाणारा रेडिओ कार्यक्रम मानला जातो. तसेच भारतीय परंपरा, संस्कृती, इतिहास, स्वातंत्र्यसंग्राम, आणि सकारात्मक नागरी उपक्रम यांवर आधारित हे कार्यक्रम ज्ञानाचा एक अद्वितीय खजिना बनले आहेत. या समृद्ध सामग्रीचा लाभ घेऊन भारताच्या वारशाचा व प्रगतीचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या स्पर्धेमधून मिळत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, तिरुवनंतपुरम (केरळ)

.

.

.

.

.


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading