
भुसावळ | 3 जुलै 2025 — वाघुर नदी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर अंकुश ठेवण्यासाठी भुसावळ महसूल विभागाकडून कारवाईची मालिका सुरूच आहे. तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने जोगलखेडा शिवारात धडक कारवाई केली.

राज्य शासनाच्या घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटपाच्या निर्णयानुसार, जप्त केलेल्या वाळूचा उपयोग जोगलखेडा व भानखेडा गावातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती २ ब्रास प्रमाणे ४ जुलै २०२५ रोजी करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामपंचायत व महसूल अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
तहसीलदार नीता लबडे यांनी शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाजवळील पुलाच्या कामाची पाहणी केली असता, तेथेही अंदाजे ६० ब्रास वाळूचा साठा सापडला. या साठ्याची सुद्धा चौकशी करून तो जप्त करण्यात येणार आहे. तसेच, रस्ता बांधकामासाठी वापरलेला मुरूम आणि माती यांचेही पंचनामे करून त्याचा उपयोग घरकुल लाभार्थ्यांसाठी करण्याचे आदेश देण्यात आले.
या संपूर्ण कारवाईत मंडळ अधिकारी प्रवीण पाटील, तलाठी मिलिंद तायडे, नितीन केले, रोशन कापसे, शितल अवस्थी, निशा गायकवाड, कोतवाल जितेश चौधरी, पोलीस पाटील भूषण पाटील व शरद पाटील यांचा सक्रिय सहभाग होता.
या भागातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलीस विभागालाही पत्र पाठवण्यात आले आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
.
.
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7