
आरोग्य, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम, निरोगी भारताच्या दिशेने एक मोठं पाऊल.
पंढरपूर (सोलापूर) येथे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या मार्गदर्शनात आज भागवत एकादशीच्या शुभमहुर्तावर युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत “फिट इंडिया – सायकल वारी” चे आयोजन करण्यात आले. सदर सायकल वारीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातून आलेल्या ५००० सायकलपटूंनी पंढरपूरच्या वारकरी परंपरेत रंग भरत सहभाग नोंदवून अनोखा विक्रम केला आहे.
देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली “फिट इंडिया” चळवळ आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. “फिट इंडिया – संडेज ऑन सायकल” ही युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय द्वारे डिसेंबर २०२४ मध्ये सुरू केलेली एक देशव्यापी फिटनेस चळवळ आहे. हा उपक्रम सायकलिंगला शाश्वत, समावेशक आणि पर्यावरणपूरक व्यायामाचा एक प्रकार म्हणून प्रोत्साहन देतो ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे असून, प्रत्येकाने हफ्त्यातून १ वेळा १ तासासाठी का होईना सायकल चालवायला हवी असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय क्रीडा प्राधिकरण मुंबईचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे, IRS आणि प्रसिद्ध एंडुरन्स सायकलस्वार व १९ वेळा आयर्नमॅन असलेले अमित समर्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी अश्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, पंढरपूर
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7