Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ विभागात तिकीट तपासणी मोहीमेला मोठे यश; तिकीटविना प्रवासावर प्रभावी नियंत्रण

भुसावळ विभागात तिकीट तपासणी मोहीमेला मोठे यश; तिकीटविना प्रवासावर प्रभावी नियंत्रण

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने तिकीटविना व अनियमित प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली असून, यामुळे प्रवासात शिस्तीचा प्रसार व महसूल सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. वाणिज्य विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे तिकीटविना व अनियमित प्रवासाविरुद्ध ठोस पावले उचलून प्रामाणिक प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुनिश्चित केला आहे.
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या नेतृत्वाखाली मे 2025 मध्ये भुसावळ विभागाने एकूण ₹11.19 कोटींचा महसूल तिकीट तपासणीद्वारे मिळवला असून, 1,18,000 प्रकरणे नोंदविण्यात आले. मे 2024 मध्ये ₹7.82 कोटींचा महसूल जमा झाला होता, त्यामुळे यंदा 43.22% वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तिकीट तपासणीद्वारे मिळवलेला एकत्रित महसूल ₹22.12 कोटींवर पोहोचला आहे, जो विभागाच्या सातत्यपूर्ण व लक्षवेधी कार्याची साक्ष आहे.
या यशस्वी कामगिरीमागे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची निष्ठा व परिश्रम कारणीभूत आहेत. एप्रिल व मे 2025 या दोन महिन्यांमध्ये दोन कर्मचाऱ्यांनी विशेष कामगिरी करून संपूर्ण विभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे :
निसार खान (TTI) – भुसावळ विभागातील सर्वोत्कृष्ट तिकीट तपासणी कर्मचारी ठरले :
एप्रिल 2025 मध्ये 1,577 प्रकरणे नोंदवून ₹25,20,900 चा महसूल जमा केला. मे 2025 मध्ये 1,597 प्रकरणांद्वारे ₹32,03,250 चा महसूल वसूल केला त्यांच्या अथक मेहनतीमुळे तिकीट तपासणी क्षेत्रात एक आदर्श उभा राहिला आहे.
सी. पी. बडगे (TTI, अमेनीटी कर्मचारी वर्ग) – आपल्या विभागात अव्वल ठरले :
एप्रिल 2025 मध्ये 649 प्रकरणांतून ₹12,68,660 चा महसूल मिळवला
मे 2025 मध्ये 850 प्रकरणांद्वारे ₹18,52,400 चा महसूल वसूल केला त्यांचे कार्य हे महसूल संरक्षण व प्रवासी सुविधा यामध्ये अमेनीटी कर्मचाऱ्यांचे वाढते योगदान अधोरेखित करणारे आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी विभागाच्या रणनीतीपूर्ण नियोजनाची व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवाभावाची फलश्रुती आहे. भुसावळ विभाग तिकीट नियमांचे काटेकोर पालन, प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि रेल्वे सेवांची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अशा उपक्रमांद्वारे कटिबद्ध आहे.


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading