
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज बिहार राज्याची राजधानी पाटणा येथील पाटलिपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या भव्य उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावली स्पर्धेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्फत व्हर्च्युअल पद्धतीने करून संबोधण्यात आले. उद्घाटन समारंभ मध्ये बिहारची विविध संस्कृती, तरुण खेळाडूंची ऊर्जा आणि उत्साह दिसून आला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थितांना संबोधतांना युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा आणि क्षमता वाढविण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी खेलो इंडिया उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या स्पर्धेच्या यशासाठी बिहार राज्य सरकार च्या भूमिकेचे कौतुक करताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी तरुण खेळाडूंना अत्यंत समर्पणाने आणि क्रीडा भावनेने पूर्ण करण्यास आणि त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले.
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आपल्या देशाला क्रीडा महासत्तेत रूपांतरित करण्याच्या केंद्र सरकार च्या मोहिमेतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे तरुण नवोदित प्रतिभांचा शोध घेण्याचे प्रभावी माध्यम असण्यासोबतच हे खेळ शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देतात आणि आपल्या तरुणांमध्ये शिस्त, टीमवर्क आणि खिलाडूवृत्ती यासारखी मूल्ये रुजवतात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय क्रीडा मंत्रालय खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देत असून सर्वोत्तम पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत, जेणेकरून ते उच्च पातळीवर स्पर्धा करू शकतील असे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हाजी, बिहारचे क्रीडा मंत्री सुरेंद्र मेहताजी व इतर मान्यवर पाहुणे आणि खेळाडू उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, पाटणा (बिहार)
See this also 👇
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7