Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना रेल्वे स्थानकावर मोफत सरबत वाटप

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना रेल्वे स्थानकावर मोफत सरबत वाटप

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक ४ मे २०२५ रोजी अकोला रेल्वे स्थानकावर एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात रेल यात्री एकता मजदूर संघाच्या वतीने रेल्वे सुरक्षा बल, स्टेशन मास्तर, मुख्य वाणिज्य निरीक्षक व तिकीट तपासणी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेत रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत पाणी व थंड सरबत वाटप करण्यात आले.
हा उपक्रम गाडी क्रमांक १२८३३ (हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस) आणि २२८४५ (पुणे-हटिया एक्सप्रेस) या गाड्यांच्या प्रवाशांसाठी आयोजित करण्यात आला. या दोन गाड्यांना अकोला स्थानकावर प्रवाशांना थंड पाणी व सरबत देण्यात आले. विशेष करून अनारक्षित कोच ठिकाणी पाण्याचे वाटप करण्यात आले जेणेकरून प्रवाशाना मोठ्या प्रमाणात सुविधा झाली.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, अकोला

See this also 👇


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

कालबाह्य शासकीय वाहनांचा तात्काळ लिलाव करा; केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कालबाह्य शासकीय वाहनांचा तात्काळ लिलाव करा; केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading