
महाराजस्व अभियानांतर्गत शिक्षण अधिकारी व शाळेतील सर्व मुख्याध्यापक तालुक्यातील सर्व सेतू चालक यांची संयुक्तिक बैठक आयोजित करून विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशा साठी लागणारे आवश्यक व महसूल विभागाकडून वाटप होणारे जातीचे दाखले, वय-अधिवास दाखले, राष्ट्रीयत्व दाखले, आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र उत्पन्न दाखले विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशापूर्वीचं शाळेतचं उपलब्ध व्हावे असे नियोजन केले होते, त्याअनुषंगाने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी वराडसीम येथील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयात 5वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांचे एकूण जातीचे 49 दाखले, 84 इतर शालेय दाखले असे एकूण 143 दाखले यावेळी भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांचे हस्ते वितरण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचाली साठी करता मार्गदर्शन सूद्धा केले. सदरचा कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामपंचायत वराडसीम येथे ग्रामपंचायत दक्षता समितीची बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या तहसील कार्यालयाच्या संबंधित काही अडचणी समस्या ऐकून घेतल्या, काही आदिवासी जमातीच्या लोकांना योजनेचा लाभ मिळत नसला तसेच जातीचे दाखले मिळत नसल्याबाबत यावरून तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी यांना स्थानिक चौकशी करून प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना दिल्या. आदिवासी महिलांनी याबाबत आनंद व्यक्त केला असेच उपक्रम यापुढे प्रत्येक गावात घेतला जाईल असे तहसीलदार नीता लबडे यांनी यावेळी सांगितले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7