जळगाव रन गृप तर्फे आयोजित “खान्देश रन” मॅरेथॉन स्पर्धेस सागर पार्क जळगांव येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या मॅरेथॉन स्पर्धेस केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह तर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली.
सदर “खान्देश रन” च्या 3/5/10/21 किलोमीटर स्पर्धेसाठी महाराष्ट्र तथा जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवला. जळगाव रन गृपने या स्पर्धेचे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन केले होते. यासाठी जळगाव रन गृपचे अध्यक्ष किरण बच्छाव व त्यांच्या सर्व टीमचे केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी अभिनंद करून विजेत्यांना बक्षीस वितरण केले.
यावेळी केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व आमदार सुरेश भोळे यांच्यासह नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, केदार बारबोले, जैन ईरिगेशनचे संचालक अथांग जैन, सुप्रीम पाईपचे सुरेश मंत्री, उद्योजक मनोज अडवाणी, राजेश चोरडिया यांची उपस्थिती होती.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव