
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा. संजयजी सावकारे व सहअध्यक्ष खा. श्रीमती स्मिताताई वाघ यांच्यासह उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत विकासात्मक कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले तसेच केंद्र सरकार पुरस्कृत योजना – प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अमृत योजना, रोजगार हमी, दीनदयाळ विद्युतीकरण योजना, मूलभूत सुविधा प्रकल्प, डिजिटल इंडिया योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वल अशुरंस योजना, सर्वशिक्षा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह वस्त्रोद्योग मंत्री मा. संजयजी सावकारे, सहअध्यक्ष खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7