Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / महसूल विभाग भुसावळ अंतर्गत 3 मोबाईल टॉवर सिल

महसूल विभाग भुसावळ अंतर्गत 3 मोबाईल टॉवर सिल

महसूल विभाग भुसावळ अंतर्गत मोबाईल टॉवर यांचे कडेस अकृषिक सारा 50 लाख थकबाकी असुन, थकबाकी असलेल्या मोबाईल टॉवर पैकी 3 मोबाईल टॉवर आज दि. 05/12/2023 रोजी सिल करण्यात आलेले आहेत.


सदर कारवाई तहसिलदार निता लबडे, भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. कारवाई करण्यात आलेल्या मोबाईल टॉवर मध्ये रिलायन्स जियो मोबाईल टॉवर 1, इंडस मोबाईल टॉवर 1 व एटीसी इंफो 1 यांचा समावेश आहे. उर्वरित भुसावळ तालुक्यातील टॉवर थकबाकी न भरल्यास मा. तहसिलदार भुसावळ यांनी थकबाकीदार मोबाइल टॉवर यांना त्वरीत थकबाकी न भरल्यास उर्वरित टॉवर देखील लगेच सिल करण्यात येतील असे नोटीस व्दारे कळविण्यात आलेले आहे. या अगोदर तालुक्यातील सर्व मोबाईल टॉवर थकबाकीदार यांना थकबाकी भरण्यास नोटीस देण्यात आलेल्या आहेत, मात्र थकबाकी न भरल्याने सदर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई प्रफुल्ल कांबळे (मंडळ अधिकारी भुसावळ), पवन नवगाळे (तलाठी भुसावळ शहर), मिलींद तायडे (तलाठी साकेगांव) यांनी केलेली आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading