BSP उमेदवाराच्या गाडीतून १ लाख रुपये जप्त
गोंदिया, दि.31ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष आघाडीच्या उमेदवार डॉ.विजया राजेश नंदुरकर(ठाकरे)या आज रविवारला प्रचारानिमित्त गोंदियाला येत असतांना त्यांच्या वाहनाची तपासणी करण्यात आली.तसेच उमेदवार डॉ.विजया नंदुरकर यांच्याकडे असलेल्या हँडबगमध्ये १ लाख रुपयाची रोखड मिळाल्याने त्या रकमेबद्दल ठोस पुरावे न सादर केल्याने ती रक्कम जप्त करण्यात आली ही कारवाई मंडळ अधिकारी बळीराम भेंडारकर यांच्या पथकाने केली.कारंजा पोलीस मुख्यालयासमोर वाहनाची तपासणी करण्यात आली,
त्यावेळी उमेदवाराकडून सदर रकमेबद्दल पुरावे सादर करण्यात न आल्याने ती रक्कम जप्त करण्याची कारवाई करीत असताना गोंदिया जिल्हा बसपाप्रमुख पंकज यादव,दुर्वास भोयर यांनी तिथे येऊन शासकीय कार्यात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्याविरुध्द गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोबतच तिरोडा येथील चंद्रभागा नाका येथील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालयासमोर इंडिका कार एमएच ३५ पी ४८११ मध्ये रोख रक्कम असल्याची माहिती मिळताच नायब तहसिलदार व्हनकडे यांच्यासह सहायक पोलीस निरिक्षक कैलास गवते यांनी घटनास्थळी पाचून वाहनाची तपासणी केली असता मागच्या सीटवर एका पिशवीत,टिनाच्या पेटीत तसेच कारच्या मागच्या डिक्कीत एका पिशवीमध्ये ७७ लाख रुपयाची रोख रक्कम मिळाली.सदर रक्कमेबद्दल कारमध्ये असलेले लेखापाल आकाश मनोहर वालदे,गाडीचालक देवेंद्र पालादूंरकर यांना विचारणा केली असता त्यांनी योग्य उत्तर न दिल्याने तसेच कागदपत्र सादर न केल्याने ती रक्कम जप्त करुन आयकर विभाग तसेच जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे.