भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा गोंदिया येथे आज आयोजित करण्यात आली आहे.यासभेला येण्यासाठी तिरोडा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे चारचाकी सुमो वाहनाने येत असतांना त्यांच्या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन 7 कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना घडली.बोपेसर येथून टाटा सूमो MH34 K5603 ने हे येत असताना गंगाझरी पोलीस ठाणेंतर्गत किंडगीपारजवळ हा अपघात घडला.जखमीमध्ये बोपेसर येथील गणराज रहांगडाले, महादेव भेलावे, धनराज भेलावे यांचा समावेश असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Report : Anmol Patle
News Desk : Khabar 24 Express