Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / कचारगड येथे कोयापुनेम यात्रा १७ फेब्रुवारीपासून : Report Anmol Patle

कचारगड येथे कोयापुनेम यात्रा १७ फेब्रुवारीपासून : Report Anmol Patle

सालेकसा(गोंदिया) दि. ०५ ::आशिया खंडातील सर्वांत मोठी गुफा सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे आहे. १७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान येथे कोयापुनेम यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कचारगड येथे आदिवासी दैवत कुपारलिंगो, माँ काली कंकाली यांच्या पावनभूमीवर लाखो श्रद्धाळू येऊन आशीर्वाद घेतात.

या कोयापुनेम यात्रेचा शुभारंभ १७ फेब्रुवारीला शंकर मडावी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दुर्गाप्रसाद ककोडे, संतोष पंधरे, पांडुरंग खंडाते, मोहन पंधरे, पर्वतसिंग कंगाली, मसराम मडावी, गुलाबसिंग कोडोपे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. १८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता राष्ट्रीय गोंडवाना अधिवेशन ध्वजारोहण तसेच महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आ. संजय पुराम, दादा हिरासिंग मरकाम, वासुदेव टेकाम, रघुनाथ मरकाम उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता राष्ट्रीय गोंडी सांस्कृतिक महोत्सव, १९ रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रीय कोयापुनेम महासंमेलनाचे उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते व खासदार मधुकर कुकडे, इंद्रराज मरकाम, राजेश बहाद्दूरसिंह, संज उके, राजेश अजबशाह, रामकुमार सिंह, जगनसिंह आदींच्या उपस्थितीत पार पडेल.

२० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्यमंत्री अमरीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेत पार पडेल. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, अशोक नेते, आमदार संजय पुराम, सीमा मडावी, देवराज खोडी, भीमराव कोराम, आनंदराव गेडाम उपस्थित राहणार आहेत. २१ फेब्रुवारीला महाअधिवेशनाचे समापन होणार आहे. याप्रसंगी वीरेंद्र उईके, भरत मडावी, गोपालसिंह उईके, गंगा मडावी, शिवलाल सयाम, लालूराम उईके, महेश उईके उपस्थित राहणार आहेत. कोयापुनेम यात्रेच्या यशस्वितेसाठी दुर्गाप्रसाद ककोडे, रमणलाल सलाम, संतोष पंधरे, बारेलाल वरखडे, मनीष पुराम, रामेश्वर पंधरे, शकुंतला परते, सुरेश परते, जोहन कुंभरे, फिरतू मडावी, शंकर उईके आदी प्रयत्नत आहेत.

Report : Anmol patle

Please follow and like us:
189076

Check Also

क्यों मनाते हैं अक्षय तृतीया, क्या है इससे जुड़ा धार्मिक इतिहास? इससे सम्बंधित मान्यताओ के विषय मे बता रहे हैं स्वामी सत्येंद्र सत्यसाहिब

इस तिथि को अक्षय तृतीया यानी जिस तिथि का कभी क्षय या समापन नहीं हो,यो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy khabar 24 Express? Please spread the word :)