जळगाव न्यूज | जिल्हा प्रतिनिधी : राजेंद्र परसे | खबर 24 खबर चौबीस एक्सप्रेस

जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नशिराबाद टोल नाका परिसरात गंभीर पाणी साचल्याची समस्या निर्माण झाली आहे. नशिराबाद पुलाखालील बोगद्यात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्याचा फटका सर्विस रोडलाही बसला आहे. परिणामी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
या समस्येविरोधात नशिराबाद येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येत काही काळासाठी नशिराबाद टोल नाक्यावरील टोलवसुली बंद पाडली. यावेळी “आधी रस्ते सुधारा, मगच टोल घ्या!” अशी जोरदार घोषणा देत संबंधित यंत्रणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, पाणी निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी NHAI आणि प्रशासनाला दिला आहे.
राजेंद्र परसे
जिल्हा प्रतिनिधी, जळगाव
खबर 24 खबर चौबीस एक्सप्रेस
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7