Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

मराठी पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

Bureau Report Akash Dhake | Bhusawal News | Khabar 24 Express

भुसावळ प्रतिनिधी : मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारणारे मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरातील मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम तालुका अध्यक्ष संतोष शेलोडे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील खान्देश लाईव्ह कार्यालयात पार पडला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला तालुका अध्यक्ष संतोष शेलोडे व उपाध्यक्ष कमलेश चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर प्रथम मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू करणारे आचार्य जांभेकर यांच्या कार्यावर संघटनेचे कोषाध्यक्ष विनोद गोरधे व सुनील आराक यांनी प्रकाश टाकला.


या कार्यक्रमास प्रेम परदेशी, वसंत कोलते, शाम गोविंदा, सतीश कांबळे, किशोर शिंपी, प्रकाश पवार, शंतनु गचके, प्रशांत बोरोले, किशोर साळवे, अजर शेख, मजर शेख, जोहेब सय्यद, विनोद सुरवाडे, मनोहर लोणे आदी पत्रकार उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश ढाके यांनी मानले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांना पेढे वाटप करण्यात आले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading